Site icon

ऐश्वर्या राय बच्चनला नाशिकच्या सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस, दिला कारवाईचा इशारा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 21 हजार 960 रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.

सिन्नरमधील ठाणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचा एक वर्षाचा कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच तालुक्यातील इतरही 1200 मालमत्ता धारकांना कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ऐश्वर्याने Suzlon या पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत गुंतवणूक केलेली आहे.

 थकबाकीदारांत या कंपन्यांचा समावेश …

बिंदू वायू ऊर्जा लिमिटेड, एअर कंट्रोल प्रा. लि., मेटकोन इंडिया प्रा. लि., छोटाभाई जेठाभाई पटेल आणि कंपनी, राजस्थान गम प्रा. लिमिटेड, एल बी कुंजीर इंजिनिअर, एस. के. शिवराज, आयटीसी मराठा लिमिटेड, हॉटेल लीला व्हेंचर लिमिटेड, बलवीर रिसॉर्ट प्रा. लि., कुकरेजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ओपी एंटरप्रायझेस कंपनी गुजरात, रामा हँडिक्राफ्ट, अल्ग्रो व्हेंचर्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

The post ऐश्वर्या राय बच्चनला नाशिकच्या सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस, दिला कारवाईचा इशारा appeared first on पुढारी.

Exit mobile version