ऑनलाइनपेक्षा शाळेत यायला जास्त आवडतेय’; शिक्षणमंत्र्यांचा विद्यार्थिनींशी दिलखुलास संवाद

मनमाड (जि. नाशिक) : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शुक्रवारी (ता. २९) एका खासगी कार्यक्रमाला आल्या असता त्यांनी बुरकुलवाडी येथील पालिकेच्या शाळेला भेट दिली. शाळेत मुलींशी संवाद साधत ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षणाविषयी चर्चा केली. ऑनलाइनपेक्षा आम्हाला शाळेत यायला आवडते, असे सांगत विद्यार्थिनींनी शाळेविषयी आवड प्रकट केली. 

वर्षा गायकवाड लवाजम्यासह दुपारी दोनला मनमाड-नांदगाव रस्त्यावर असलेल्या बुरकुलवाडी येथील पालिकेच्या शाळा क्रमांक सातकडे वळल्या. मंत्रिमहोदय येणार असल्याची अनेकांना कल्पना नव्हती. मात्र शाळा प्रशासनाला कळाल्याने त्यांनी तातडीने स्वागताची तयारी केली. शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी एन. एम. चंद्रमोरे, मुख्याध्यापक वसंत माळी, शिक्षक मोहन झाल्टे, निवृत्ती भुजबळ, ओम गोखले, विकास तरटे, पालिकेच्या शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक मनीष गुजराथी यांनी वर्षा गायकवाड यांचे स्वागत केले. शिक्षणमंत्री गायकवाड यांनी शाळेची पाहणी केली. मुलांना चांगले शिकविले जाते का, याची चौकशी केली. 

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल

ऑनलाइन उपक्रमांचे प्रेझेंटेशन 

शिक्षणमंत्र्यांनी शाळेत मुलींशी संवाद साधला. मुलींनी स्वागतगीत सादर केले. पल्लवी सोनवणे या विद्यार्थिनीने आईवर आधारित गीत सादर केले. ऑफलाइन व ऑनलाइन शिक्षणाविषयी मुलांशी चर्चा केली. शाळेतील सर्व शिक्षकांनी शाळेला चार स्मार्ट टीव्ही दिले. ते टीव्ही शुक्रवारीच सुरू करण्यात आले. त्याच टीव्हीवर शाळेत लॉकडाउन काळात राबविलेल्या उपक्रमांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल