ऑनलाइन ‘रॉलेट’ जुगारचा सूत्रधार पोलीसांच्या ताब्यात; आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा

नाशिक : ऑनलाइन रॉलेट जुगारचा सूत्रधार कैलास शाह यास नाशिक जिल्हा पोलिसांनी गुरुवारी अटक केली आहे. ‘रोलेट’ या ऑनलाइन जुगाराच्या आहारी जाऊन त्र्यंबकेश्वरमध्ये काही दिवसांपुर्वी एका तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी अखेर मुख्य आरोपी कैलास शहा याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपासासाठी त्याला त्र्यंबकेश्वर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

तरुणाच्या आत्महत्येसाठी कारणीभूत

‘रोलेट’ या ऑनलाइन जुगाराच्या आहारी जाऊन त्र्यंबकेश्वरमध्ये काही दिवसांपुर्वी एका  तरुणाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात रोलेट जुगार खेळविणाऱ्या संशयित कैलास शहा व त्याच्या दोघा साथीदारांविरुद्ध तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात शहा हा मागील काही दिवसांपासून पोलिसांना हवा होता. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने त्यास नाशिकमधून शिताफीने गुरूवारी नाशिक शहरातून अटक केली.

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO 

जिल्हा न्यायालयातून अटक

त्र्यंबकेश्वर जवळील अंबोली गावात राहणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या व्यक्तीने केलेली आत्महत्या ही रोलोट गेममुळे झालेले स्पष्ट झाले. बुधवारी (ता.11) दुपारी  नाशिक येथील जिल्हा न्यायालयामध्ये केलेल्या एका अटकपूर्व जामिनाचा अर्जसाठी कैलास शहा, शांताराम पगार, सुरेश वाघ त्र्यंबकेश्वरला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे जिल्हा न्यायालयाच्या परिसरातून शहा याला अटक केली आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड