
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंटरनेटवरून लग्न जुळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकास एका महिलेने गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात महिलेविरोधात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत माधव पाटील (रा. गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना ७ एप्रिल ते २२ मे दरम्यान महिलेने इंटरनेट व फोनमार्फत गंडा घातला. अभिजीत हे मॅट्रोमोनियल संकेतस्थळावरून वधुचा शेाध घेत होते. त्यांना आवडलेल्या मुलीसोबत लग्न जमविण्यासाठी तसेच तिच्यासोबत कॉन्फरन्स कॉल, झुम मिटींगद्वारे बोलणे करून देण्याच्या माेबदल्यात महिलेने अभिजीतकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार अभिजीत यांनी ऑनलाइन पद्धतीने ६ लाख १० हजार रुपये टाकले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिजीत यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
हेही वाचा :
- इर्शाळवाडीची दुर्घटना पाहिली की, डोळ्यासमोर उभे राहते माळीण आणि तळीये गाव, नेमकं काय घडले होतं या गावांमध्ये?
- मणिपूरमधील ‘ताे’ व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्याचे केंद्राचे निर्देश
The post ऑनलाइन वधु शोधणाऱ्यास 6 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.