ऑनलाइन सोने खरेदीचा नवा ट्रेंड! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नागरिकांकडून प्रतिसाद 

नाशिक : गुडीपाडवा सण आनंदाचा, नववर्षाचा विजय आणि समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या गुढीची चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी उभारणी केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने लाखोंची उलाढाल होते. यंदा कोरोनामुळे कडक निर्बंध असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद आहेत. तरीही नाशिककरांनी खरेदीचा उत्साह कमी न करता ऑनलाइन माध्यमातून खरेदी करून शुभमुहूर्त टळू दिला नाही. सोने खरेदीही विविध संकेतस्थळांनी उपलब्ध करून दिल्याने ऑनलाइन सोने खरेदीचा नवा ट्रेंड आला आहे. 

यंदा नेहमीपेक्षा चांगला प्रतिसाद

ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध ऑफर्स दिल्या जात असल्यामुळे नागरिक आकर्षित होत असून, खरेदीकडे कल वाढलेला आहे. ऑनलाइन संकेतस्थळातून मोबाईलसह अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना अधिक मागणी असल्याचे दिसत आहे. ऑनलाइन खरेदीपेक्षा अनेक जणांचा पारंपरिक दुकानांमध्ये खरेदी करण्याकडे कल असतो; परंतु ऑफलाइन बाजारपेठांमध्ये कोरोनाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेतर्गत कठोर निर्बंध आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून खरेदी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने गुडीपाडवाच्या दिवशी खरेदीकडे कल वाढल्याचे दिसते. क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे विविध ऑफर असल्याने ऑनलाइन खरेदी करणे सुलभ झाले आहे. गेल्या वर्षी गुडीपाडव्याला लॉकडाउन होता. त्यामुळे नागरिकांना ऑफलाइनसह ऑनलाइन खरेदी करता आली नाही. यंदाही कठोर निर्बंधांमुळे ऑफलाइन बाजारपेठ बंद आहे. ऑनलाइन संकेतस्थळाच्या माध्यमातून यंदा नेहमीपेक्षा चांगला प्रतिसाद असल्याचे कुरिअर कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले. 

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

कोरोना काळात ऑनलाइन शॉपिंगचा फार मोठ्या प्रमाणात फायदा सर्वांनाच होतो आहे. बाहेर दुकानात जाऊन दहा वस्तू तपासून घेण्यापेक्षा ऑनलाइनच व्हरायटी उपलब्ध असतात. त्यामुळे सुरक्षित खरेदी करणे शक्य होते आणि लोकांचा थेट येणारा संपर्कदेखील टाळता येतो. या फायद्यामुळेच इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने व इतर सामान ऑनलाइनच घेणे पसंत करत आहे. 
-शुभम चौधरी, नाशिक 

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात