ओझर बनले कोरोना हॉटस्पॉट! रुग्णसंख्या सातशेपार, संसर्ग रोखण्यासाठी रस्ते सील 

ओझर (जि. नाशिक) : सर्वत्र वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर ओझर नगर परिषद प्रशासनाने गावातील गडाख कॉर्नर येथून ओझर गावात प्रवेश करणारा रस्ता व शिवाजी चौकमार्गे सुकेणे मार्ग वगळता सर्व मुख्य रहदारी मार्ग, प्रमुख गर्दीची ठिकाणे बॅरिकेडिंग लावून सील केले आहेत. 

ओझरला सातशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले, तहसीलदार शरद घोरपडे, पोलिस निरीक्षक अशोक रहाटे, मंडळ अधिकारी प्रशांत तांबे, तलाठी उल्हास देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत ओझर गावात उपाययोजना आखण्यात आली. त्यानुषंगाने गावातील रस्ते व प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

ओझर गावातील रस्ते बंद केल्याने गावातील व उपनगरांतील नागरिकांची गैरसोय होणार असल्याची प्रशासनाला जाणीव आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. नागरिकांनी घरी सुरक्षित राहून प्रशासनाला मदत करावी. 
-शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब