नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क ; सध्या मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. अशातच छगन भुजबळ यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. यात एक कार्यकर्ता व छगन भुजबळ यांचा संवाद ऐकू येत आहे. या ऑडीओ क्लीपवर भुजबळांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.
व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये भुजबळ म्हणतात की, “सगळी मंडळी आली असून, आता आपण आवाज उठवायला पाहिजे. मी तर म्हणतोय की आवाज उठवा, मी एकटा कुठपर्यंत लढणार, गावागावात त्यांचे बुलडोजर चालले आहेत. यात ओबीसी काही वाचणार नाही आता, करेंगे या मरेंगे अशी स्थिती झाली आहे, काय आहे असंही मरतंय तसंही मरतंय. असा भुजबळांचा संवाद आहे, त्यावर कार्यकर्ता म्हणतोय साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही यावर काही तरी निर्णय घ्या, भुजबळ म्हणताय हो मी आता उभा राहतो आहे. असा हा संवाद व्हायरल झाला आहे.
या क्लीपवर जरांगे पाटील यांनी देखील प्रतीक्रीया दिली असून करेंगे या मरेंगे हा भुजबळांचा प्रश्न आहे, त्यांना यातून काय संदेश द्यायचा आहे. त्यावर आम्ही काही बोलू शकणार नाही. मात्र, मराठा समाजाचे महाराष्ट्रात शांततेत आंदोलन सुरु आहे. लढेंगेभी और जितेंगेभी असे आमचे वाक्य असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
दरम्यान, या ऑडिओ क्लीपवर छगन भुजबळ यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे, आपण ओबीसी समाजाला आवाहन करु शकतो असे मी म्हटले आहे. सगळीकडून सध्या ओबीसी आरक्षणावर आक्रमण सुरु असून आमदारांची घरे पेटवली जात आहेत. यांसदर्भात आता आपण कुणीतरी काहीती बोललं पाहीजे, ते एका आवाजात बोललं पाहीजे असा त्याचा अर्थ असल्याचे स्पष्टीकरण भुजबळांनी दिले आहे. तसेच इतर लोक जसे त्यांच्या समाजाला आवाहन करतात तसे मी ओबीसीमधील 375 जातींना आवाहन करु शकतो की, आपणही आपलं दु:ख एकमुखाने मांडले पाहिजे असे भुजबळ म्हणाले आहेत.
The post ओबीसी आता काही वाचणार नाही, भुजबळांची ऑडिओ क्लीप व्हायरल appeared first on पुढारी.