ओव्हरटेक करणे बेतले जीवावर; दोन मित्रांपैकी एक जागीच ठार

सोग्रस (जि.नाशिक) : दोघे मोटारसायकलने लासलगावकडून चांदवडकडे येत होते. दरम्यान दुचाकीस्वाराला काय बुध्दी सुचली कोण जाणे ओव्हरटेक करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घातला. काय घडले नेमके?

ओव्हरटेक करण्याच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात

सुनील पवार (वय ३२, रा. पाटे, चांदवड) आणि सौरभ रामटेके (रा. नारायण खेड, चांदवड) हे दोघे मोटारसायकल (एमएच १५, बीयू १४३०)ने लासलगावकडून चांदवडकडे येत होते. चांदवडकडून लासलगावकडे जाणाऱ्या कंटेनरचालक (एमएच ४६, बीबी १६३८) सुभाष भोसले (रा. मोही मान, सातारा)ने दिघवदजवळ ओव्हरटेक करताना समोरून त्याच दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील सुनील पवार ठार झाला. सौरभ रामटेके जखमी झाला.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

चांदवड पोलिसांत नोंद

चांदवड-लासलगाव रस्त्यावर दिघवद शिवारात सोमवारी (ता. १) दुपारी एकच्या सुमारास कंटेनर व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार, तर एकजण जखमी झाला. जखमीला चांदवड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चांदवड पोलिसांत नोंद झाली आहे.  

हेही वाचा - बालविवाह झालेल्या 'त्या' दुर्दैवी मुलीचा मृत्यू; आईची सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार