औद्योगिक क्षेत्रात कामगार उद्योजकांचे नाते कौटुंबिक हवे – पो. आ. दीपक पांडे 

सातपूर (नाशिक) : देशाची प्रगती व विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात कामगार उद्योजकांचे नाते कौटुंबिक हवे. त्यासाठी पोलिस प्रशासनातर्फे संपूर्ण सहकार्य केले जाईल. मात्र, उद्योगांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी केले. औद्योगिक क्षेत्रातील शांतता व पोलिस प्रशासनाची भूमिका याबाबत निपम व अभिनव इन्स्टिट्यूट संस्थेतर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

उद्योगांनी कायदाचे पालन करावे 
स्कील डेव्हलपमेंट अंतर्गत ‘शिका व कमवा’ या योजनेसाठी अभिनव इन्स्टिट्यूट टेक्नॉलाॅजी मॅनेजमेंट व ‘निपम’तर्फे निवेक क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. ‘निपम’चे अध्यक्ष सुधीर पाटील, पोलिस उपायुक्त संग्रामसिग निशानदार, अमोल तांबे, विजय खरात, अभिनव इन्स्टिट्यूटचे सुधीर दीक्षित आदी उपस्थित होते. ‘औद्योगिक शांततेसाठी पोलिसांची भूमिका’ याविषयावर पोलिस आयुक्त पांडे व त्यांच्या टीमने मार्गदर्शन केले. या वेळी अनेक कंपन्यांच्या एचआर व्यवस्थापकांनी विविध शंका पोलिस आयुक्त पांडे यांना विचारल्या. त्यांनी बिनधास्तपणे त्यांचे उत्तर व योग्य सल्ला दिला.

हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचे आवाहन 

अभिनव इन्स्टिट्यूटचे हेड सोनल कोहले यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत प्रजेंटेशन सादर केले. ‘निपम’चे सुधीर पाटील यांनी प्रास्ताविक केले. सुधीर दीक्षित यांनी आभार मानले.  

हेही वाचा > वाढदिवशीच दोघा मित्रांवर काळाची झडप; 'तो' प्रवास ठरला अखेरचाच