कत्तलीसाठी लपवून ठेवलेले ६७ गोवंश जनावरे घोटी पोलीसांनी घेतले ताब्यात

इगतपुरी (नाशिक): पुढारी वृत्तसेवा – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर घोटी पोलिसांनी मोठी कारवाई पार पाडली असून इगतपुरी तालुक्यातील कावनई आणि शेनवड बुद्रक या ठिकाणी जंगल परिसरामध्ये लपवून ठेवलेल्या गोवंश जनावरांना नाशिक ग्रामीण पोलिस व घोटी पोलीसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आणि घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. घोटी पोलीस ठाणे हद्दीतील कावनई आणि शेणवड बुद्रुक या दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाई मध्ये ६७ गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाण्यात येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. पोलीसांनी धाड टाकून ६७ गोवंश जनावरे पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची पांजरपोळ मध्ये रवानगी केली आहे. तर या दोन्ही कारवाईत आरोपी सिद्धार्थ भगवान शिंदे आणि नजीर शेख दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केली असून आणखी काही ठिकाणी अशा पद्धतीने कत्तलीसाठी गोवंश जनावरे लपवून ठेवण्यात आले आहेत का? याचा पोलीस कसोशीने तपास करत आहेत.

हेही वाचा: