कधी थांबणार ही वणवण! रेमडेसिव्हिरचा तुटवडा कि काळाबाजार?

नाशिक : ऑक्टोबर २०२० मध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजार प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड इमारतीतील कंत्राटी ब्रदर (परिचारक) दीपक सातपुते याला अटक करण्यात आली होती. सिव्हिल हॉस्पिटलमधूनच या इंजेक्शनची चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याने तेथील रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता बळावली होती.  यंदाही भरउन्हात डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेऊन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी मेडिकल दुकानांचे उंबरठे झिजविणाऱ्या, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव पाहता त्यांच्याकडून रेमडेसिव्हरचा काळाबाजार होतोय की तुटवडा? अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

काळाबाजाराला बसावा चोप

रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठीची नागरिकांची वणवण कामय आहे. वाढत्या प्रादुर्भावात रुग्‍णांची अत्यावस्थता वाढत असल्याने रुग्णालयाकडून नानाविध औषधोपचार इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यापैकी रेमडेसिव्हिर हा एक पर्याय सुचविला जातो. सहाजिकच शहरातील मोठ्या संख्येने रुग्णालयांकडून रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी शिफारस केली जात आहे. सहाजिकच भावनाविवश रुग्णांचे नातेवाईक उन्हातान्हात वणवण करीत, मेडिकल दुकानासमोर रांगा लावत आहे. दोन दिवसांपासून रांगा कमी होईना, वाढत्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पाहणी करून रेमडेसिव्हीर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. रेमडेसिवीर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत आणि ही औषधं कोरोना रुग्णांना कमीत कमी दरानं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी आता होऊ लागली आहे. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

जिल्हाधिकारींकडून सुचना 
 रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळविण्यासाठी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बाधितांच्या नातेवाइकांच्या भेटी घेऊन आढावा घेत त्यानंतर उपचार सुरू असलेल्या गरजूना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. नाशिक जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजक्शनचा तुटवडा कायम आहे. जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुडवड्याबाबत आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आढावा घेत खात्री करून घेतली. मांढरे यांनी स्वतः रांगेत उभे असलेल्या गरजू रुग्णांच्या नातेवाइकांकडील बाधित असल्याचे रिर्पोट आणि प्रिस्क्रिप्शन तपासले. 

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

वितरणासाठी प्रोटोकॉल 
रुग्णालयाचे शिफारसपत्राच्या मूळ प्रती संबंधित औषध विक्रेत्यांनी जतन करून ठेवणे, तसेच तपासणीच्या वेळी तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे. संबंधित रुग्णाचे आधारकार्ड किंवा फोटो असलेला पुरावा, तसेच शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले अन्य कागदपत्रं उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे. औषध विक्रेत्यांनी संबंधित प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे स्कॅन करून ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्या मुळे रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिर अग्रक्रमाने उपलब्ध होईल व अनावश्यक खरेदी करण्यास आळा बसेल, 

हवी ऑनलाइन सोय 
रेमडेसिव्हिर इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिले जात नाही. डॉक्टरांकडून गरजू रुग्णांसाठी प्रिस्क्रिप्शन दिले जाते म्हणून गरजूंचे नातेवाइकांना फिरावे लागते आहे. बंद, जमावबंदी हे सगळे नियम असूनही बाधितांच्या नातेवाइकांना रांगा लावाव्या लागत आहे. इंजेक्शन थेट रुग्णालयांना उपलब्ध करून देण्याची सोय केल्यास त्यासाठी ऑनलाइन इंजेक्शन मिळण्‍याची सोय झाल्यास, नागरिकांची गर्दी कमी होउन काळाबाजाराला आळा बसण्यास मदत होईल. मात्र तशी कुठलीच व्यवस्था नाही. त्या मुळे उन्हातान्हात रांगा लावण्याची नातेवाइकांवर वेळ आली आहे. 

काळाबाजारप्रकरणी कठोर कारवाई
औषध वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधण्याचे आवाहन करतो - दुष्यंत भामरे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त 

 

रेमडेसिव्हिर महत्त्वाचे इंजेक्शन आहे. मी स्वता रियॅलिटी चेक केले. त्यात असे आढळले, की बरेच लोक प्रिस्क्रिप्शन घेतात आणि इंजेक्शनसाठी गर्दी करतात. रेमडेसिव्हिरच्‍या वापराचे काही नियम आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते दिले जातात. सरसकट सगळ्यांना जे ॲडमिट आहे, तसेच त्यांना गरज आहे, डॉक्टरांनी तसे प्रमाणित केले आहे अशा उपचार सुरू असलेल्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. -सूरज मांढरे, 
जिल्हाधिकारी, नाशिक  

वितरक पुढीलप्रमाणे :
पिंक फार्मसी सर्विसेस- विजय दिनानी : 9371530890, एनडीसीसी बँकेजवळ, समर्थ हॉटेल;
सुर्या मेडिकल- अतुल अहिरे : 9371281999, सुर्या आर्केड, निमाणी बस स्टॉपजवळ;
सिक्ससिगमा मेडीकल- अभय बोरसे : 9823063095, महात्मानगर;
सुरभी मेडिकल- शिवाजी पाटील : 9890626624, सुर्या हॉस्पिटल, मुंबईनाका
व्होकार्ट हॉस्पिटल लिमिटेड- किरण कुलकर्णी : 9763339842, वाणी हाऊस, वडाळा नाका
पायोनिर मेडिकल- शंकर हरवाणी : 9011524620, आर्यन प्लाझा,अशोका मार्ग
जयराम मेडिकल- आशिष जोशी : 9552501508, मुक्तीधाम रोड, नाशिकरोड
सहृदया हेल्थकेअर- रविंद्र हडवले : 8669370177, अशोका मार्ग, इंदिरानगर
हॉस्पिकेअर एजन्सी- पगारे : 9689884548, रविशंकर रोड, इंदिरानगर;
भगवती डिस्ट्रीब्युटर्स- राजेंद्र महाजन : 9850986885 (इटोलिझुमॅब), सुर्योदय कॉलनी, सावतानगर;
सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल- नीलेश महाडिक : 7588557735, वडाळा नाका;
चौधरी ॲण्ड कंपनी- विरेन चौधरी : 9545774545, गोळे कॉलनी;
कुचेरीया मेडीकल एजन्सी- महेश जैन : 8888803222, शांतीमाधव हाईटस, गोळे कॉलनी; 
शितल फार्मा- सुरेश नवनदर : 9822057242, जानकी प्लाझा, गोळे कॉलनी;
रूद्राक्ष फार्मा- राजकुमार कासार : 9518314781, हेमवर्षा बिल्डिंग, गोळे कॉलनी;
पुनम एन्टरप्राईजेस- मेहुल शहा : 9921009001, गद्रे मंगल कार्यालयाजवळ, गोळे कॉलनी;
महादेव एजन्सी- हेमराज पंजाबी : 9989908555, गोळे कॉम्प्लेक्स, गोळे कॉलनी;
करवा फार्मासुटिकल्स- अशोक करवा : 9822478110, केमिस्ट भवन, गोळे कॉलनी;
सरस्वती मेडिकल; राजेंद्र धनडे : 9422259685, सटाणा रोड,