कन्फर्म तिकीट नाही, तर रेल्वेस्थानकात प्रवेश नाही!

नाशिक रोड : कन्फर्म तिकीट असल्यावरच प्रवाशांनी रेल्वेस्थानकाची पायरी चढावी. ज्यांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही अशांनी रेल्वेस्थानकात येऊ नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

ज्यांचे तिकीट कन्फर्म झालेले नाही अशांनी रेल्वेस्थानकात येऊ नये.

भुसावळ विभागातील रेल्वेस्थानकांवर तिकिटाची कडक तपासणी सध्या सुरू असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. कोविडच्या आव्हानात्मक परिस्थितीत रेल्वेस्थानकावर गर्दी करू नये, गाडी सुरू होण्याच्या ९० मिनिटे आधी रेल्वेस्थानकावर यावे, अतिरिक्त सेवांच्या विशेष कारणांबद्दल आणि बुकिंगच्या संदर्भात पॅनिक बुकिंग,असा तर्क काढणे टाळावे, कोविडचा संसर्ग थांबविण्यासाठी फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी आहे.

हेही वाचा - काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू  

रेल्वेच्या प्रवाशांनी नियम व कायदा मोडू नये,

सध्या भुसावळ विभागात तिकिटांची कडक तपासणी सुरू असून, रेल्वेच्या प्रवाशांनी नियम व कायदा मोडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.  

हेही वाचा - सदैव हसतमुख 'मुस्कान' कायमची हिरावली; भावा पाठोपाठ बहिणीच्या मृत्यूने कुटुंबावर मोठा आघात