कमालच झाली! तक्रार मागे घेण्यासाठी गेले पोलिस ठाण्यात अन् झाले भलतेच

मालेगाव (नाशिक) : भ्रष्टाचाराची पाळेमुळे व्यवस्थेच्या तळागाळात पोहचली आहेत, या भ्रष्ट व्यवस्थेचा प्रत्येय नुकताच एका वडिलांना आला स्वतःचा मुलगा हरवल्याची तक्रार वडिलांनी पोलिस ठाण्यत दिली. पण त्यानंतर काही दिवसांत ते पुन्हा त्यांनी दिलीली तक्रार वापस घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागले.

 पोराच्या भविष्याची काळजी

मुलगा हरविल्याची तक्रार वडिलांनी मालेगावातील पवारवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रार केल्यानंतर काही दिवसांत मुलगा स्वत:हून परत घरी आला. मुलाच्या भावी आयुष्यात अडचण येवू नये, यासाठी वडिलांनी हरवल्याची तक्रार मागे घेण्याचे ठरविले. त्यासाठी ते पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलीस नाईक चंद्रकांत हरिभाऊ कडनोर यांना मुलगा घरी आला असून तक्रार बंद करायची असल्याचे सांगितले. 

हेही वाचा >> बारा दिवस झुंजूनही अखेर सलोनीला मृत्यूने गाठलेच; मामाच्या गावी भाचीचा दुर्देवी अंत

आणि पोलिसांनी सापळा रचला..

पोलिस नायकाने ही तक्रार बंद करण्यासाठी वडिलांकडून ५ हजार रुपयांची मागणी केली. मुलाच्या वडिलांनी देखील याप्रकरणी थेट लाचलुपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीनुसार  कारवाई करत पथकाने पडताळणी करत सापळा रचला. पवारवाडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशव्दाराजवळ तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने कडनोर यास अटक केली.चंद्रकांत हरिभाऊ कडनोर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस नाईकाचे नाव आहे. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हेही वाचा >> खळबळजनक! तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाची थेट मिळाली डेड बॉडीच; कुटुंबाला घातपाताचा संशय