कर्नाटकमध्ये जाण्यासाठी आरटीपीसीआर बंधनकारक; विमान कंपन्यांना सूचना

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी बंधनकारक केली आहे.

नाशिकहून बेळगाव विमानसेवा चालविणाऱ्या स्टार एअरवेज कंपनीला तशा सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारने बंधने अधिक कडक केली आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जात आहे. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लागून असलेल्या राज्यांमध्ये सतर्कता राखली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून विमान कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जानेवारी महिन्यापासून नाशिकहून कर्नाटकातील बेळगाव शहरासाठी विमानसेवा सुरू झाली आहे. विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत. 

हेही वाचा - केवळ दैव बलवत्तर म्हणून बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले बहिण-भाऊ; साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले