कर्मवीरांच्या शैक्षणिक योगदानातून बहुजन समाज समृध्द : डी. बी. मोगल यांचे प्रतिपादन

देवळाली कॅम्प, प्रतिनिधी

स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. त्यामुळे बहुजन समाजाची प्रगती समाधानकारक झाली नाही, बहुजन समाज शिक्षणाशिवाय सुधारणार नाही, हे सत्यशोधक समाजाचे विचार शिरोधार्य मानुन कर्मवीरांनी कष्टकरी बहुजन समाजासाठी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाज समृध्द करण्यास मोठे योगदान दिले. असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती डी.बी. मोगल यांनी केले.

येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शनिवारी [ दि. 19 ] कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जन्मदिवशी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा समाजदिन कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मविप्र समाज संस्थेचे उपसभापती डी. बी. मोगल होते. प्रमुख पाहुणे म्हणुन खासदार हेमंत गोडसे, अॅड. एन. जी. गायकवाड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड, कँटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड, सेवक संचालक डॉ. एस. के. शिंदे, प्राचार्य डॉ. एस. एस. काळे होते. उपसभापती डी. बी. मोगल पुढे म्हणाले की, आजवर मविप्र संस्थेला कर्तृत्वान नेतृत्व लाभले, त्यामुळे संस्थेने आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेतल्याचे म्हटले.

प्रमुख अतिथी म्हणुन बोलतांना खासदार हेमंत गोडसे म्हणाले की, आजच्या स्पर्धेच्या युगात मविप्रने विविध व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात बदल स्वीकारुन एक नामवंत शिक्षण क्षेत्रात नावलौकीक मिळवून दिला. दोन लाखांच्या पुढे विद्यार्थी संख्या सुमारे दहा हजार सेवक असलेली मविप्र संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात मोठा आदर्श निर्माण केलयाचे खासदार गोडसे यांनी सांगीतले.
कॅटोन्मेंट बोडाचे माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड म्हणाले की, पंचक्रोशितील मुला मुलीना शिक्षणाची द्वारे खुली करुन स्वताच्या पायावर उभे करण्यात येथील एसव्हीकेटी कॉलेजचा मोठा हातभार असल्याचे म्हटले.

जेष्ठ सभासद अॅड. एन. जी. गायकवाड म्हणाले की, मराठा विद्या प्रसारक समाजाने गोरगरीब वर्गातील मुलांना शिक्षण देत आपल्या पायावर उभे करण्यास हातभार लावला. मविप्र संस्थेची स्थापना करतांना कर्मवीरांना मोठा त्याग करावा लागल्याचे सांगीतले.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास धुर्जड यांनी एसव्हीकेटी कॉलेजने नव्याने सुरु केलेलया एम.एससी मायक्रो, बीसीऐ आदी विविध शैक्षणिक कोर्स सुरु करून प्रगतीचा आढावा मांडला. कार्यक्रमाला सुरुवता ध्वजारोहणाने झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक भाषणात बोलतांना प्राचार्य डॉ. एस. एस. काळे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणावर ठराविक वर्गाची मक्तेदारी होती. सत्यशोधक समाज चळवळीतुन आणि कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या योगदानातुन मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेची स्थापना करण्यात आली. याद्वारे बहुजन शिक्षणाला शिक्षणाची संधी प्राप्त झाली. याप्रसंगी सुरेश मोगल, पी. बी. गायधनी, सुधाकर गोडसे, अॅड. गंगाराम पोरजे, आर. डी. धोगडे, कौशलया मुळाणे, अॅड. वर्षा देशमुख, शिवाजी गायधनी, अॅड. अशोक आडके, वैभव पाळदे, गजीराम मुठाळ, बेलतगव्हान सरपंच मोहनीष दोदे, सुर्यभान गायधनी, सुनिल जाधव, विलास गायधनी शेखर फरताळे, विठठल ढेरिंगे, कैलास दळवी, शरद कासार, रतन गोडसे, माणिकराव गोडसे, अण्णा पाटील, कचरूभाऊ आडके, ज्ञानेश्वर पाळदे, रघुनाथ देवकर, कैलास भांगरे, जयेश हांडोरे, रमेश महानुभाव, उपप्राचार्य डी. टी. जाधव, प्रा. शाम जाधव, डॉ. बी.पी. पगार, विक्रम काकुळते, डॉ. सुनील सौदाणकर, आदी होते. सत्रसंचलन प्रा. सविता आहेर यांनी केले. आभार उपप्राचार्य एस. के. शिंदे यांनी मानले.

हेही वाचा :

The post कर्मवीरांच्या शैक्षणिक योगदानातून बहुजन समाज समृध्द : डी. बी. मोगल यांचे प्रतिपादन appeared first on पुढारी.