
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कलंक शब्दप्रयोग महाराष्ट्रातील जनतेला रुचला नसून, राजकारणात व्यक्तिगत पातळीवर टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दांत राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरे यांना फटकारले.
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात ना. भुसे यांनी मंगळवारी (दि. ११) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. त्याप्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
नागपूरच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांचा थेट कलंक म्हणून उल्लेख केला होता. याबाबत ना. भुसे यांना विचारले असता, त्यांनी ठाकरे यांनी उच्चारलेला शब्दप्रयोग योग्य नाही. राज्यातील जनतेला हा शब्दप्रयोग रुचलेला नसून, ही आपली संस्कृतीही नसल्याचे ना. भुसे म्हणाले.
आमदार अपात्रतेबाबत कायद्याच्या चौकटीत आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास ना. भुसे यांनी व्यक्त केला. शिवसेना नाव आपल्याकडे राहील, या ठाकरे यांच्या दाव्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. लोकशाहीत प्रत्येकाला न्याय मागण्याचा अधिकार असल्याचे ना. भुसे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
- Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ६५,६१७ वर बंद, काय आहेत तेजीची कारणे?
- सोलापूर : गांजा ओढण्यास विरोध केल्याने महंतावर हल्ला
- सोलापूर : गांजा ओढण्यास विरोध केल्याने महंतावर हल्ला
The post 'कलंक' शब्दप्रयोग महाराष्ट्राला रुचला नाही : दादा भुसे appeared first on पुढारी.