कळवण तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी एक कोटी ४३ लाखांची नुकसान भरपाई! 

कळवण (नाशिक) : तालुक्यात १२, १३ व १४ ऑगस्टच्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ९० गावांतील पाच हजार ८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून एक कोटी ४३ लाख ४६ हजारांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचा बँक खाते क्रमांक घेतल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली. 

अवकाळी पावसामुळे दहा हजार ७७३ शेतकऱ्यांच्या दोन हजार ८७५ हेक्टर क्षेत्रातील मका, बाजरी, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी एक कोटी ९५ लाख, ५१ हजार ३६० रुपये नुकसानभरपाईचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९० गावांतील पाच हजार ८६८ शेतकऱ्यांना एक कोटी ४३ लाख ४६ हजार ३६० रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाली असून, दुसऱ्या टप्प्यात ६० गावांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे, असे आमदार पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली

या गावातील शेतकऱ्यांचा समावेश

 राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे अभोणा, अंबापूर, अंबिका ओझर, अंबुर्डी (बु), अंबुर्डी (खुर्द), आमदर, आठंबे, बगडू, बालापूर, बार्डे, जुनी बेज, बेलबारे, बेंदीपाडा, भादवण, भगुर्डी, भाकुर्डे, भांडणे (हा), भांडणे (पि), भेंडी, भुताने (दि), बिजोरे, बिलवाडी, बोरदैवत, चाचेर, चणकापूर, चिंचोरे, दह्याणे (दि), दळवट, दरेभणगी, दरेगाव (हा), पिंपळे (बु), दत्तनगर, देसगाव, देसराने, देवळी कराड, देवळीवणी, धनेर दिगर एकलहरे, गांगवण, गणोरे, गोबापूर, गोपाळखडी, गोसराणे, हुडयामोख, जयपूर, जामले वणी, जामले (हा), जामशेत, जिरवाडे (हा), जिरवाडे (ओ), ककाणे, कळवण बुद्रुक, कळवण खुर्द, कन्हेरवाडी, करंभेळ (हा). करंभेळ (क), कातळगाव, काठरे दिगर, खडकी, खडकवण, खर्डेदिगर, खिराड, कोसुर्डे, कोसवण, कुडांणे (क), कुडांणे (ओ), लखाणी, लिंगामे, माचीधोडप, मळगाव बुद्रुक, मळगाव खुर्द, मानूर, मेहदर, मोहमुख, मोहणदरी, मोहबारी, मोहपाडा, मोकभणगी, नाकोडे, नाळीद, नांदुरी, नरुळ, नवी बेज, निवाणे, ओतूर, ओझर, पाडगण, पळसदर, पिळकोस, शेरी दिगर आदी ९० गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.  

हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार