कष्टाने पिकविलेला शेतमाल मातीमोल! बाजारात शेकडो जुड्या फेकून परतले शेतकरी

नाशिक : संकटांचा सामना करत मोठ्या काबाडकष्टाने पिकविलेले पीक, त्याला खतपाणी घालून शेतकऱ्याने मेहनतीने पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला नाही, शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते. असाच काहीसा प्रकार भाजीपाला बाजारात होताना दिसून येत आहे. शेतकरी पीक अक्षरशः रस्त्यावर फेकून निघून जात आहेत.

नाशिकच्या बाजार समिती च्या आवारात सध्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे, य़ाचा परिणाम म्हणून सध्या भाजीपाल्याचे भाव खसरले आहेत. मेथी, शेपू आणि कोथींबिर अवघे एक ते तीन रूपये प्रति जुडी असा भाव मिळत आहे. यामुळे मिळाणार अल्पदरामुळे उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. बाजार समितीच्या आवारात शेकडो जुड्या तेथेच फेकून अनेक शेतकऱ्यांना परतावे लागले.

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

रविवारी तर एक रूपया जुडी

नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला मुंबईचे वाशी मार्केट तसेच अन्य ठिकाणी पाठवला जातो. त्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला घेऊन येतात. सध्या आवक वाढल्याने दर मात्र घरसले असून यामुळे शेतकऱ्यांना माल येथेच टाकून जाण्याची नामुष्की येत आहे. गेल्या रविवारी तर एक रूपया जुडी असा भाव मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा एक ते तीन रूपये भाव मिळाल्याने सकाळीच बाजार समितीत शेतकरी तसेच शेतमाल टाकून निघून गेले.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

भाजीपाल्याचे दर सातत्याने घरसत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. नाशिक जिल्हयाच्या अन्य बाजार समित्यामंध्ये कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने शेतकरी आधीच त्रस्त असतानाच आता भाजीपाल्याचे दर कोसळल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडले आहेत