
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
मुंबईकडे जाणाऱ्या मध्ये रेल्वेच्या अप मार्गावर कसारा ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रूळा खालील खडी धसल्याने रेल्वे रुळांची उंची कमी जास्त झाली. यामुळे नाशिक व कसारा येथुन मुंबई सीएसटीकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती.
यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस इगतपुरी, घोटी, लहवीत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. हा खड्डा भरण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडुन युद्ध पातळीवर सुरू केले असून यामुळे अप मार्गाची वाहतूक एक तास उशिराने सुरू आहे. तर लोकल धिम्यागतीने सुरू असुन लवकरच या रेल्वे मार्गाची वाहतुक सुरळीत होईल असे रेल्वे प्रशासनाकडुन सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
- नगर : पावसाने 350 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
- गुजरात कांदा उत्पादकांना मदत करतय, मग महाराष्ट्र का नाही? छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला सवाल
- लवंगी मिरची : पॉवरफुल्ल महिला
The post कसारा ते उंबरमाळी दरम्यान रेल्वे रुळा खालील खडी धसल्याने रेल्वे वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.