काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल; दिव्यांग मारहाणप्रकरणी कारवाई 

नाशिक : मालेगाव-तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतच्या वादासंदर्भात जिल्हा परिषदेत सुनावणीपूर्वी सीईओंच्या दालनाबाहेर दिव्यांग तक्रारदारास मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिव्यांग व्यक्तीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे समजते.

दिव्यांग व्यक्तीस मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यात टोकडे गावाच्या विद्यमान सरपंच सुपडाबाई निमडे यांचा मुलगा भाऊलाल पंडित निमडे यांचाही समावेश आहे.  टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्या आधारे चौकशी समिती नेमून झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्या उपस्थितीत ७ आॅक्टोबरला गावाच्या सरपंच सुपडाबाई पंडित निमडे यांच्या वतीने ॲड. सचिन वाघ हे जि. प. मध्ये सुनावणीस उपस्थित होते.

सर्व प्रकार जि.पच्या सीईओ लीना बनसोड यांच्यासमोर घडला.

सुनावणी सुरू होण्याच्या काही वेळा अगोदरच तक्रारदार विठोबा द्यानद्यान येथे पोहोचले त्यांना बघताच जि. प. परिसरात अनधिकृतपणे प्रवेश करत दबा धरून बसलेले सरपंच पुत्र भावलाल निमडे, ग्रा. पं. रोजगार सेवक हाटेसिंग धाडिवाळ, शांताराम लाठर, नामदेव शेजवळ यांनी द्यानद्यान यांच्या शर्टाची कॉलर पकडून मारहाण केली. या चौघांनी द्यानद्यान यांना पकडले व या प्रकरणात तु फरार आरोपी आहेत तुला अधिका-यांपुढे पुढे उभे करतो, असे म्हणत ढकलून दिले. गंभीर बाब म्हणजे हा सर्व प्रकार जि.पच्या सीईओ लीना बनसोड यांच्यासमोर घडला. त्यांनी पोलिसांना बोलावण्याची सूचना केल्यानंतर मारहाण करणारे घटनास्थळावरून पळून गेले.

भद्रकाली पोलिसांची दिव्यांग मारहाणप्रकरणी कारवाई 

याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपंग अधिकार अधिनियम 2016 कलम 92 अंतर्गत पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, नामदेव शेजवळ, सरपंच पुत्र भाऊलाल निमडे, ग्रा. पं. रोजगार सेवक हाटेसिंग धाडिवाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बी.के. चतुर करत आहेत. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

काय आहे प्रकरण 
टोकडे ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांच्या कागदोपत्री भ्रष्टाचार प्रकरणी 7 ऑक्टोबरला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांच्याकडे सुनावणी होणार होती. या सुनावणी पुर्वीच दिव्यांग तक्रारदार विठोबा द्यानद्यान यांना मारहाण झाली. संशयित आरोपी विरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात विठोबा यांनी तक्रार दिली होती. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान