काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल; दिव्यांग मारहाणप्रकरणी कारवाई 

नाशिक : मालेगाव तालुक्यातील टोकडे ग्रामपंचायतीच्या वादातून जिल्हा परिषदेत सुनावणीपूर्वी जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दिव्यांग तक्रारदारास मारहाण केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. टोकडे गावाच्या सरपंच सुपडाबाई निमडे यांचा मुलगा भाऊलाल पंडित निमडे यांचाही समावेश आहे. दिव्यांग व्यक्तीस मारहाण केल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. 

टोकडे ग्रामपंचायतीने केलेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार येथील रहिवासी विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हा परिषदेकडे केली होती. त्याआधारे चौकशी समिती नेमून झालेल्या प्रकाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या उपस्थितीत ७ ऑक्टोबरला गावाच्या सरपंच सुपडाबाई पंडित निमडे यांच्यातर्फे ॲड. सचिन वाघ जिल्हा परिषदेत सुनावणीस उपस्थित होते.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

सुनावणीला तक्रारदार विठोबा द्यानद्यान येथे पोचले, त्यांना बघताच जिल्हा परिषद परिसरात दबा धरून बसलेले सरपंचपुत्र भावलाल निमडे, ग्रामपंचायत रोजगार सेवक हाटेसिंग धाडिवाळ, शांताराम लाठर, नामदेव शेजवळ यांनी द्यानद्यान यांच्या शर्टाची कॉलर पकडून मारहाण केली. या चौघांनी द्यानद्यान यांना पकडले व ‘या प्रकरणात तू फरारी आरोपी आहेस, तुला अधिकाऱ्यांपुढे पुढे उभे करतो,’ असे म्हणत ढकलून दिले. या प्रकरणी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांताराम लाठर, नामदेव शेजवळ, सरपंचपुत्र भाऊलाल निमडे, ग्रामपंचायत रोजगार सेवक हाटेसिंग धाडिवाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता