काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी देण्यार्‍यावर गुन्हा दाखल करा – धुळे शहर काँग्रेसची मागणी

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व त्यांच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देणार्‍या कर्नाटक चित्तपूर विधानसभा भाजपाचे उमेदवार मनीकांत राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली. जिल्हा पोलिस अधिक्षकांना शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांच्या परिवाराला कर्नाटक भाजपाचे विधानसभा उमेदवार मनीकांत राठोड यांनी धमकी दिली आहे. मनीकांत राठोड हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे व्यक्ती असून त्यांच्यावर कर्नाटकात अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी दिल्याने खर्गे व त्यांच्या परिवाराच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी धुळे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने धुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाव्दारे करण्यात आली. याबाबत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, सेवा दलाचे अध्यक्ष अलोक रघुवंशी, शहर काँग्रेस उपाध्यक्ष प्रा. जसपाल सिसादिया यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली.

हेही वाचा:

The post काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना धमकी देण्यार्‍यावर गुन्हा दाखल करा - धुळे शहर काँग्रेसची मागणी appeared first on पुढारी.