कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्याने कांदा उत्पादकांसोबतच व्यापारी अडचणीत सापडले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर ऊतरले असून व्यापाऱ्यांमध्येही असंतोष आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि.२२) बैठक बोलविली आहे.

निर्यात शुल्क दरवाढीमुळे जानोरी (ता. निफाड) तसेच मुंबई येथील जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ४०० ते ५०० कंटेनर कांदा निर्यातीसाठी प्रवासात आहे. एका कंटेनर मध्ये ३० हजार किलो याप्रमाणे साधारणत: बाराशे ते दिड हजार मेट्रिक टन कांद्या व्यवहार अडचणीत येणार आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

हेही वाचा :

The post कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक appeared first on पुढारी.