कांद्याच्या भावातील वृद्धी कायम; क्विंटलला ५० ते ४०० रुपयांनी वाढ 

नाशिक : नवीन लाल कांद्याच्या भावात मागील आठवड्यात झालेल्या घसरणीला लगाम लावत सोमवारी (ता. १०) भावात वाढ झाली होती. कांद्याच्या भावातील वृद्धी मंगळवारी (ता. ९) कायम राहिली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी क्विंटलला ५० ते ४०० रुपयांनी वाढ झाली. मुंगसेमध्ये मात्र क्विंटलला सरासरी तीन हजार ४५० रुपये असा भाव कायम राहिला. 

जिल्ह्यात कांद्याची विक्री; क्विंटलला ५० ते ४०० रुपयांनी वाढ 
जिल्ह्यातील बाजारपेठेत सोमवारी तीन हजार १०० ते तीन हजार ५० रुपये असा क्विंटलला सरासरी भाव मिळाला. मंगळवारी सरासरी तीन हजार २०० ते तीन हजार ५०० रुपये क्विंटल भावाने जिल्ह्यात कांद्याची विक्री झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी लासलगाव, कळवणमध्ये ५०, तर सटाणा आणि उमराणेमध्ये १००, पिंपळगावमध्ये २५०, मनमाडमध्ये ३००, देवळ्यात ४०० रुपयांनी भावात वृद्धी झाली. सोमवारी कांद्याला मिळालेल्या भावामुळे सरासरी क्विंटलचा भाव साडेतीन हजार रुपयांपर्यंत पोचणार हे स्पष्ट झाले होते. गुजरात, पश्‍चिम बंगाल, कर्नाटकमधील नवीन कांदा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा अवधी बाकी असल्याने या महिनाअखेरपर्यंत साडेतीन हजारांच्या आसपास भाव राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांचा राहिला होता. 

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलचे सरासरी रुपयांमध्ये)
 
बाजारपेठ मंगळवार (ता. ९) सोमवार (ता. ८) 
लासलगाव ३ हजार ४७० ३ हजार ४२० 
कळवण ३ हजार ५०० ३ हजार ४५० 
मनमाड ३ हजार ४०० ३ हजार १०० 
सटाणा ३ हजार २५० ३ हजार १५० 
देवळा ३ हजार ५०० ३ हजार १०० 
उमराणे ३ हजार २०० ३ हजार १०० 
पिंपळगाव ३ हजार ४५१ ३ हजार २०१  

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट