कांद्याच्या शेतात फेरफटका मारताच फुटला घाम! समोरील दृश्याने भरली धडकी

तळवाडे दिगर (जि.नाशिक) : विजय काकुळते यांनी शिवारात कांद्याची लागवड केली आहे. त्यात ते सकाळी शेतात फेरफटका मारत असताना त्यांना असे काही दिसले ज्याने त्यांना घाम फुटला..

कांद्याच्या शेतात फेरफटका मारताच फुटला घाम...

विजय काकुळते यांच्या शिवारातील गट क्रमांक ८९/१/२ मध्ये कांद्याची लागवड केली आहे. त्यात ते सकाळी शेतात फेरफटका मारत असताना त्यांना एक बिबट्या मृत आढळला. त्यांनी स्थानिक पोलिसपाटील कडू काकुळते यांना माहिती दिली. वन विभाग सटाणा परिक्षेत्राचे अधिकारी हिरे यांना कळविण्यात आले. सटाणा येथील प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन शवविच्छेदन केले. बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय अंदाजे दीड वर्षे असल्याचे सांगण्यात आले. नैसर्गिक मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा - सिव्हील हॉस्पीटलमधून बालिका अपहरण प्रकरणी अपहरणकर्त्याकडून खुलासा! वेगळेच सत्य समोर

बिबट्या मृतावस्थेत आढळला

किकवारी खुर्द (ता. बागलाण) येथील ब्राह्मणदरा शिवारातील शेतकरी विजय काकुळते यांच्या कांद्याच्या शेतात मंगळवारी (ता. १६) सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळला. वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. हिरे, वनरक्षक एन. एम. मोरे, एच. वाय. आहिरे, वनपाल जे. के. शिरसाठ, वनमजूर तारू सोनवणे, कृष्णा काकुळते यांनी सहकार्य केले.  

हेही वाचा - अख्खे गाव हळहळले! दोन सख्ख्या बहिणींच्या एकत्रच निघाल्या अंत्ययात्रा; पाच मुलांमधून आता तिघांचाच आधार