नाशिक : पुढारी वृत्तसेवा; काकाकडील दोन मोबाइल हॅक करून (Mobile Hacking) त्यातील संपर्क क्रमांक, वैयक्तिक छायाचित्रे, व्हिडिओ व इतर महत्त्वाचा डेटा डिलीट केल्याप्रकरणी पुतण्याविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव येथील रहिवासी उमेश मधुसूदन कुलकर्णी (५६) यांनी या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात त्यांचा पुतण्या दीपक सुभाषचंद्र कुलकर्णी (३७, रा. उत्तमनगर, सिडको) विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह फिर्याद दाखल केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश यांच्या मोबाइलमध्ये असलेल्या ईमेलला संपर्क क्रमांक हा पुतण्या दीपक याने स्वत:चा जोडला होता. त्यामुळे उमेश यांच्याकडील दोन्ही मोबाइलची माहिती दीपकच्या ईमेलवर सेव्ह होत होती. दरम्यान, १३ ऑगस्टला रात्री आठच्या सुमारास दीपकने उमेश यांच्या इमेलवरून फोटो, व्हिडिओ, संपर्क क्रमांक व इतर महत्त्वाची माहिती डिलीट केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर उमेश यांनी दीपक विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
हेही वाचा :
- कुटुंब नियोजनावर वादग्रस्त वक्तव्य; मुख्यमंत्री नितीशकुमारांचा माफीनामा
- Pimpri News : ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करा!
- Pimpri News : ‘त्या’ बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करा!
The post काकाचा मोबाइल हॅक, पुतण्यावर गुन्हा appeared first on पुढारी.