पिंपळनेर (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यात मूसळधार पावसाने कान व पांझरा नदीला पूर आला. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक गावे, वाड्या वस्त्यातील घरांची पडझड झाली. यामूळे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. या नुकसानग्रस्त भागाची आमदार मंजुळा गावीत यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
कान नदी पुलावरून सात ते आठ तास पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही काठांवरील रहिवाशांचा संपर्क तुटला होता. पुरामुळे पुलाच्या दोन्हीही बाजूंना खड्डे पडल्याने पूल निकामी झाला आहे. ग्रामपंचायतने तात्पुरते सिमेंट काँक्रीट टाकून वाहतूक सुरु केली आहे. मात्र अजून पूर आल्यावर हा पूल तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तालुक्यात अनेक घरांची अंशत पडझड झालेली आहे. नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होऊ लागलेली आहे. पाठपुरावा करून नवीन पुलासाठी ताबडतोब निधी मंजूर करण्याचे प्रयत्न करू,नदीकाठी संरक्षण भित,आणि ज्या घरांची पडझड झाली त्यांना आर्थिक मदत मिळेल, असे आमदारांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा
- वर्धा : कापडी बॅग कापून ६० हजार रुपये पळविणाऱ्या दोघांना अटक
- बदलापूर-पाईपलाईन रोडवर बसखाली सापडून दुचाकीस्वार ठार
- दुष्काळग्रस्त भागासाठी जनाई योजना कार्यान्वित; माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार
The post कान नदीला पूर : नुकसान भरपाईची गावकर्यांची मागणी appeared first on पुढारी.