काबाडकष्टाने पिकवलेला दहा क्विंटल लाल कांदा शेतातून गायब; शेतकऱ्यांमध्ये संताप 

देवळा ( जि.नाशिक) : भिलवाड येथील शेतकरी केशव जाधव यांनी शेतात जवळपास १५ ते २० क्विंटल लाल कांदा शेतातच विक्रीसाठी वरळी घालून तयार करून ठेवला होता. काबाडकष्टाने पिकवलेल्या कांद्यावर कोणाची वाईट नजर पडली. या चोरीमुळे शेतकऱ्यामंध्ये संताप व्यक्त होत आहे. काय घडले नेमके?

३५ ते ४० हजारांचे नुकसान; शेतकऱ्यांमध्ये संताप 
भिलवाड येथील शेतकरी केशव जाधव यांनी शेतात जवळपास १५ ते २० क्विंटल लाल कांदा शेतातच विक्रीसाठी वरळी घालून तयार करून ठेवला होता. मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी त्यातील आठ ते दहा क्विंटल कांदा चोरून नेला. केशव जाधव यांचा मुलगा सचिन जाधव यांनी लाल कांद्याचे महागडे रोप आणून कांद्याची लागवड केली होती. कांद्याला बरे भाव असल्याने थोडाफार पैसा हातात येईल, या आशेने कष्टाने कांदा तयार केला. कांद्याला रंग येईल म्हणून पातीने झाकून ठेवला होता. बुधवारी कांदा विक्रीसाठी मार्केटला नेण्याचे नियोजन होते. चोरट्यांनी डल्ला मारल्याने सचिन जाधव यांचे जवळजवळ ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाले आहे. याआधी तालुक्यात उन्हाळी कांद्याचोरीच्या घटना घडल्या आहेत. 

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

सध्या कांदा महत्त्वाचे पीक आहे. शेतकरी कष्टाने कांदा पिकवतो. भामटे आयत्या कांद्याची चोरी करतात, ही बाब निंदनीय आहे. दिवसभर काम आणि रात्री राखण, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. -कुबेर जाधव, राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना  

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

शेतकऱ्यामंध्ये संताप

देवळा तालुक्यातील भिलवाड येथील शेतकऱ्यांच्या शेतातून आठ ते दहा क्विंटल लाल कांद्याची मंगळवारी (ता. २) रात्री चोरी झाली. या चोरीमुळे शेतकऱ्यामंध्ये संताप व्यक्त होत आहे.