कामावर निघालेल्या दोन तरुण शेतमजूरांना ट्रकने चिरडले; घटनेमुळे परिसरात हळहळ

वणी (जि. नाशिक) :  वणी - सापूतारा रस्त्यावरील वणी शिवारातील धनाई मंदिराजवळ अज्ञात वाहनाने रविवारी (दि. २८) पहाटे दुचाकीस धडक दिल्याने दोन तरुण शेतमजुर जागीच ठार झाले.

गाडीसह दोघांचा चेंदामेंदा

आज पहाटे साडे पाचवाजेच्या सुमारास धनराज वसंंत वाघमारे, (वय १७ रा. गळवड, ता. सुरगाणा)  राजेश देविदास वाघमारे  (वय. २१ रा. चिक्कारपाडा, ता सुरगाणा) हे दोघे पल्सर मोटरसायकल क्रमांक एमएच १५ एचजे ६६७४  ने पिंंपळगाव बसवंत येथे द्राक्ष व्यापाऱ्याकडे कामासाठी जात होते. वणी शिवारातील धनाई माता मंदिराजवळ अज्ञात मालवाहू वाहानाने दुचाकीस समोरुन जोरदार धडक दिली. यात  पल्सर गाडी तीस ते चाळीस फुट पुढे फरफटत गेली. धडक इतकी जोरदार होती की गाडीचे पार्टन्-पार्ट मोकळे झाले. तर दोघांच्याही अंगावरुन वाहानाचे टायर गेल्याने अक्षरशः चेंदामेंदा झाला.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

परीसरात हळहळ

दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहानाने गाडी न थांबवता वाहानासह पलायन केले असून सापुताराकडे गेलेल्या अज्ञात वाहानाचा पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे, पोलिस हवालदार चव्हाण, बागूल तपास करीत आहे. येथील ग्रामिण रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.नरेश बागूल यांनी मृतांचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दोघा तरुण शेतमजुरांवर काळाने घाला घातल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना