काम असेल त्यांनीच कोर्टात यावे! मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

नाशिक : कोरोना महामारीने देश आणि राज्यभरात अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाची रुग्णसंख्या दररोज नवे उच्चांक गाठत आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधाचा उपाय म्हणून न्यायालयाचे कामकाज दोन पाळ्यात चालविण्याचा निर्णय झाला असतांना मंगळवार (ता.३०) पासून न्यायालयातील कर्मचाऱ्यांची संख्या पन्नास टक्के घटविली जाणार आहे. तसेच न्यायालयात कामकाज नसल्यास विनाकारण प्रवेशाला प्रतिबंध करण्यात आला आहे. 

असे चालेल कामकाज

मुंबई उच्च न्यायालयानेच प्रतिबंधाविषयी आदेश जारी केले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवार (ता.२९) जारी केलेल्या आदेशानुसार कोर्ट कामकाजाची वेळ सकाळी ११ ते १:३० प्रथम सत्रात व २ ते ४:३० दुसऱ्या सत्रात राहील सर्व न्यायधीश दोन्ही सत्रात डायस वर हजर राहतील. मात्र कोर्टाचा स्टाफ ५० टक्के हजर राहील. ज्यांचे काम चालणार असेल त्याच वकील व पक्षकारांना कोर्ट हॉल मध्ये बसता येईल. तसेच एखादा पक्षकार किंवा वकील एखाद्या प्रकरणात हजर राहिला नाही तर त्याच्या विरोधात ऑर्डर केली जाणार नाही. सॅनेटेशन व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. पहिल्या सत्रात पुरावा घेण्याचे काम प्राधान्याने होईल दुसऱ्या सत्रात वकिलांचे युक्तिवाद निकालपत्राचे व इतर कामे होतील.

हेही वाचा > कोरोनात मधुमेहींसाठी 'म्युकोरमायकोसिस' रोग ठरतोय 'यमराज'!...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील न्यायालयात कामा शिवाय वकील व पक्षकार यांनी कोर्टात गर्दी करू नये असे उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समिती व न्यायाधीशांनी केढले आहेत. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा व तालुका न्यायालयांना लागू आहे उद्या (ता.३०) पासून न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यत हा आदेश लागू राहणार आहे. तारखे पासून पुढे लागू राहील 

हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण