काय सांगता! बसस्थानकात तीनच तासांत तब्बल २ हजार किलो कचरा

नाशिक : क्लीन नाशिक मोहीम महामार्ग बसस्थानकावर राबविण्यात आली. अवघ्या तीन तासांत दोन हजार २४ किलो कचरा संकलित करण्यात आला. कचरा घंटागाडीच्या माध्यमातून संकलित होत असला तरी बहुतांश ठिकाणी नागरिक कचरा टाकतात. शहरात असे ५० हून अधिक कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट निश्‍चित केले आहेत. स्वच्छ भारत अभियानात गेल्या वर्षी देशात नाशिकचा क्रमांक ११ वा आला होता. तर, राज्यात नवी मुंबईपाठोपाठ नाशिक दुसऱ्या स्थानावर होते. 

यंदा देशातील पहिल्या पाच शहरांमध्ये येण्याचा मानस नाशिक महापालिका प्रशासनाने व्यक्त करताना त्याची तयारी सुरू केली आहे. तयारीचा भाग म्हणून कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट नष्ट करण्यासाठी मिशन क्लीन नाशिक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत दर शनिवारी पालिकेच्या आरोग्य विभागासह सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट नष्ट करण्याचे कामी हाती घेण्यात आले आहे. शनिवारी (ता. २०) महामार्ग बसस्थानकात सकाळी सहा ते नऊ या वेळेत मोहीम राबविण्यात आली. आयुक्त कैलास जाधव यांच्यासह सर्वच विभागप्रमुखांनी श्रमदान केले. नाशिक प्लॉगर ग्रुप, रेम्बो ग्रुप, नमामि गोदा फाउंडेशन, सैफी ट्रस्ट दाऊदी बोहरा समाज, मिशन विघनहर्ता, मी नाशिककर या संस्थांनी सहभाग घेतला. 
 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

३६ टन कचऱ्याचे संकलन 

एक महिन्यापासून आठवड्यातील दर शनिवारी स्वच्छता मोहीम राबविली जाते. या मोहिमेत आतापर्यंत ३६.३६० टन कचरा संकलित करण्यात आला. नाशिक रोड विभागात ११.१५० टन, पूर्व विभागात ७.५१५ टन, पश्‍चिम विभागात ३.४७५ टन, पंचवटी विभागात २.५०० टन, सिडको विभागात ८.६५० टन, सातपूर विभागात ३.०७० टन या प्रमाणे महिनाभरात कचरा संकलित केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.   

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय