काय हे दुर्दैव! सोन्यासारख्या अडीच एकर डाळिंब पीकावर शेतकऱ्याने फिरवला जेसीबी

नाशिक (येवला) : डाळिंब बागेत खर्च करूनही अतिशय कठोर अंतकरणाने बाग तोडण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या उभ्या अडीच एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवला. गजाजन जिवाजीराव देशमुख असे निराशेपोटी पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. काय घडले नेमके?

निराशेपोटी पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्याचे कारण काय?

शेतकरी गजानन देशमुख यांनी सहा वर्षांपूर्वी आपल्या अडीच एकर शेतात ८०० झाडांची लागवड करीत डाळिंब बाग उभी केली. पहिले तीन वर्षे डाळिंबाला चांगला भाव मिळाला. या तीन वर्षात ५० ते ६० रुपये किलोप्रमाणे पैसे त्यांच्या हाती पडले. नंतर मात्र त्यांना समाधानकारक दर मिळाला नाही. यंदा मात्र चालू वर्षी अतिवृष्टीसह तेल्याचा रोगाचा फटका या शेतकऱ्याला बसला आहे. सततच्या पावसामुळे जे काही हाती आले त्या फळांना गुणवत्ता नव्हती. तेल्या रोगाचे डाग अधिक असल्याने बाजारभाव मिळाला नाही.

उत्पादन निम्म्यावर घटले

काढणीस आलेल्या फळांची स्थानिक बाजारात कोपरगाव येथे केली. त्यास १० ते १२ रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला. या क्षेत्रात अवघे २०० क्रेट डाळिंब म्हणजे ४० क्विंटल माल निघाला. चालू वर्षी हंगामात दीड लाखांवर खर्च केला. मात्र, उत्पन्न अवघे ४० हजार मिळाल्याने खर्चाचा ताळमेळ बसला नाही. त्यात उत्पादन निम्म्यावर घटल्याने खर्चही वसूल झालेला नाही. परिणामी तीन वर्षांपासून सततच्या नुकसानीला कंटाळून देशमुख यांनी बागेवर जेसीबी फिरवला.

हेही वाचा > अरेच्चा! लासलगावचा कांदा ‘कौन बनेगा करोडपती’वर; लासलगावचे नाव पुन्हा प्रकाशझोतात 

उभ्या अडीच एकर डाळिंब बागेवर जेसीबी

निसर्गाने फटका दिला असताना दुसरीकडे बाजारभावाअभावी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने अंदरसूल (ता. येवला) येथील शेतकऱ्याने निराशेपोटी आपल्या उभ्या अडीच एकर डाळिंब बागेवर जेसीबी फिरवला. गजाजन जिवाजीराव देशमुख असे निराशेपोटी पाऊल उचलणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा > विवाहितेच्या अंगावरील स्त्रीधन काढून अपहार प्रकरणी गुन्हा दाखल