कार घेऊन अचानक बेपत्ता झाली मनोरुग्ण तरुणी; शोध घेतल्यास परिवारालाही धक्का

नाशिक : श्रीपर्णा रॉय ही सोमवारी सकाळी ११ वाजेदरम्यान कार घेऊन बाहेर गेली. ती परत घरी आलीच नाही. तिच्या कुटुंबियांसह नातेवाईक व त्यांच्या मित्रांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. ती मनोरुग्ण असल्याने कुटुंबिय काळजी पडले होते. अखेर जेव्हा शोध लागला.. तेव्हा त्या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला. तसेच परिसरात खळबळ माजली.

श्रीपर्णा कार घेऊन गेली ती परतलीच नाही... 
श्रीपर्णा रॉय ही २० वर्षांची तरुणी सोमवारी (ता.७) सकाळी ११ वाजेदरम्यान कार (एमएच ३१-डीके ५१८८) घेऊन बाहेर गेली. ती परत घरी आलीच नाही. तिच्या कुटुंबियांसह नातेवाईक व त्यांच्या मित्रांनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ती कोठेही आढळून आली नाही. ती मनोरुग्ण असल्याने कुटुंबिय काळजी पडले होते. याप्रकरणी रॉय कुटुंबियांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बुधवारी (ता.९) सकाळी तिचा मृतदेह गंगापूर रोडवरील गंमत-जंमत हॉटेल परिसरात कारमध्ये आढळून आला. ही बाब नाशिक तालुका पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुढील तपास फॉरेन्सिक लॅबकडे

यावेळी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी शवविच्छेदन केले असता त्यांना तिच्या मृतदेहावर कोठेही इजा आढळून आली नाही. वैद्यकीय अधिकार्‍यांनी व्हिसेरा राखून ठेवला असून, पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे.

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

घटनेमुळे खळबळ

कार घेवून बेपत्ता झालेल्या मनोरुग्ण तरुणीचा मृतदेह बुधवारी गंगापूर रोडवरील हॉटेल गंमत जंमत परिसरात आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पार्क साईट, इंदिरानगर येथे राहणाऱ्या श्रीपर्णा रॉय (वय २०) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. शवविच्छेदनात तिच्या शरीरावर कोठेही इजा आढळून आलेल्या नाहीत. तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली, याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले