काळजी घ्या! नाशिकमध्ये रस्त्याने चालता-बोलता सहा जणांचा मृत्यू 

नाशिक : शहरात चक्कर येऊन तसेच चालता-बोलता श्वासाचा त्रास होऊन शनिवारी (ता. १०) दिवसभरात सुमारे सहा जणांचा मृत्यू झाला. 
नाशिक रोडला रोकडोबावाडी परिसरात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास आकाश टायटस निकाळजे (वय २७) याला राहत्या घरीच चक्कर आली. त्यात, बेशुद्ध झाल्याने त्यास बिटको रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला.

श्वासाच्या त्रासाने सहा जणांचा मृत्यू 

दुसऱ्या घटनेत लक्ष्मण तुकाराम जोरे (६४, शक्तीनगर, हिरावाडी) सायंकाळी सव्वापाचला घरातच छातीत दुखत असल्याने बेशुद्ध पडले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत सातपूरला कार्बन नाका परिसरात राजू जेठालाल राठोड (५६, चैतन्य अपार्टमेंट, आयटीआय कॉलेज) दुपारी दीडला रस्त्याने चालत असताना चक्कर येऊन पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा - ह्रदयद्रावक; वडिलांसह दोन्ही लेकांची अंत्ययात्रा, एकाच वेळी ३ कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा

नाशिकमध्ये रस्त्याने चालताना मृत्यू

चौथ्या घटनेत बायजाबाई दगडू पवार (८०, संदीपनगर, अशोकनगर) घरात असताना त्यांच्या छातीत दुखून श्वास घेण्यात त्रास होऊ लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचे निधन झाले. पाचव्या घटनेत यशवंत दत्तात्रय कुलकर्णी (७८, नंदनवन लॉन्स, कलानगर, इंदिरानगर) राहत्या घरी चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाला. सहावी घटना पवननगर येथे घडली. सुमन रामचंद्र सपकाळ (७२) राहत्या घरी अचानक बेशुद्ध पडल्या. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्यांना डॉ. पाटील यांनी मृत घोषित केले.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ