काळजी घ्या! ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत होतेय वाढ; दिवसभरात आढळले २३३ बाधित

नाशिक :  जिल्‍ह्‍यात कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये दैनंदिन आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या अधिक राहात असल्‍याने पुन्‍हा ॲक्‍टिव्‍ह रूग्‍ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. रविवारी (ता.२२) दिवसभरात २३३ कोरोना बाधिता आढळले असतांना, १७४ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. चार रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून जिल्‍ह्‍यातील ॲक्‍टीव्‍ह रूग्‍ण संख्येत ५५ ने वाढ झाली असून, सद्य स्‍थितीत जिल्‍ह्‍यात २ हजार ६११ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १५३, ग्रामीणमधील ६९ रुग्ण

रविवारी आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील १५३, नाशिक ग्रामीणमधील ६९, मालेगावचे तीन तर जिल्‍हाबाहेरील आठ कोरोना बाधित आढळून आले. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १२४, नाशिक ग्रामीणमधील ४५, तर जिल्‍हाबाहेरील पाच रूग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरित्‍या मात केली आहे. चार मृतांमध्ये नाशिक शहरातील तीन व नाशिक ग्रामीणमधील एका रूग्‍णाचा समावेश आहे. 

हेही वाचा>> नात्याला काळिमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर बापाकडून अत्याचार; मुलाला जन्म दिल्याने प्रकार उघडकीस

९४ हजार २५३ रूग्‍ण कोरोनामुक्त

दरम्‍यान जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या ९८ हजार ६२९ झाली असून, यापैकी ९४ हजार २५३ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ७६५ रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका हद्दीतील रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८०८, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १६, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात सात, जिल्‍हा रूग्‍णालयात आठ रूग्‍ण दिवसभरात दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत ४ हजार ०१७ अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील २ हजार २०९, नाशिक महापालिका हद्दीतील १ हजार ५६४ रूग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा असून, मालेगाव हद्दीतील २४४ रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

हेही वाचा>> खोदकाम करतांना सापडली सोन्याची घागर? बघायला गाव झाले गोळा; प्रत्यक्षात मात्र वेगळाच प्रकार