काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त

बॅनर pudhari.news
पंचवटी : पुढारी वृत्तसेवा 
नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरात राज ठाकरेंच्या स्वागताचे व मनसेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छांचे लावण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहे. यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असुन पोलिसांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून अज्ञाताचा शोध सुरू आहे.
मनसेचा १८ व्या वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा होत असून यानिमित्त नाशिकमध्ये मनसैनिकांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राज ठाकरे हे आज सायंकाळी नाशिकला येणार आहे व उद्या सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देऊन महाआरती करणार आहे. यानिमित्त काळाराम मंदिर परिसरात कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले होते. मात्र मध्यरात्री अज्ञाताने यातील काही बॅनर फाडल्याचा प्रकार घडला असून बॅनर कोणी आणि का फाडले ? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीसांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. तर मनसेच्या वतीने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत हालचाली सुरू आहे.

हेही वाचा:

The post काळाराम मंदिर परिसरातील घटना, मनसैनिक संतप्त appeared first on पुढारी.