काळाराम मंदिर सत्याग्रहाला ९१ वर्षे पूर्ण, शिलालेख स्तंभाजवळ अभिवादन

नाशिक - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांनी २ मार्च १९३० ला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह झाला होता.तो सत्याग्रह हा मानव मुक्तीची लढाईच मानली जाते. अस्पृश्य समाजाच्या अस्मितेची लढाई  सलग पाच वर्ष, अकरा महिने व सात दिवस चालली होती.  या सत्याग्रहास ९१ वर्ष होत आहेत, त्या निमित्ताने काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजास उभारलेल्या किर्तीमान शिलालेख स्तंभाजवळ आज अभिवादन करण्यात आले.