काही लोक बांधावर जातात, मी सर्वांनाच कामाला लावले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे

पुढारी ऑनालाईन डेस्क : “काही लोक बांधावर जातात, आणखी कोठे जातात, जाऊदेत सगळ्यांना मी कामाला लावले आहे”, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. नंदुरबार येथे नगरपरिषद इमारत लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यातील विकासाची गती मंदावली होती. राज्यात सरकार स्थापन होताच विकासाला चालना देण्याच काम केले. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले. सत्तेवर येताच तीन महिन्यामध्ये ७२ मोठे निर्णय आणि ४०० जीआर काढले. त्यामुळे काहीजण टेन्शनमध्ये आहेत, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

२०१९ मध्ये आमचं सरकार सत्तेत यायला पाहिजे होते. आमचं सरकार लोकांना मदत करणारे सरकार आहे. शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानले आहे. सरकारने लघुदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना प्रतियुनिट १ रूपया कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थिर आकारणीमध्येही १५ रूपये प्रतिमहिना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली, शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post काही लोक बांधावर जातात, मी सर्वांनाच कामाला लावले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला appeared first on पुढारी.