किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर

किरीट सोमय्या, www.pudhari.news

पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात सर्वत्र संताप व्यक्त होताना पाहायला मिळत आहे. याचे पडसाद नाशिकमध्येही उमटत असून, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी मंगळवारी (दि. १८) सकाळी पंचवटी कारंजा येथे किरीट सोमय्यांचा जाहीर निषेध करत ‘जोडे मारो’ आंदोलन केले.

कथित व्हिडिओमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या हे अश्लील चाळे करताना दिसत असल्याचा आरोप करीत सोमय्यांचा धिक्कार असो, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. बेंबीच्या देठापासून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ म्हणणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळे ‘बेटी को भाजप से बचाओ’ असे दुर्दैवाने म्हणण्याची वेळ आल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

किरीट सोमय्यांना फाशीसारखी कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा भाजपविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई कधी करणार, असा प्रश्न माध्यमांसमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडला. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश बडवे, महानगर संघटक राहुल दराडे, शिवसेनेचे नेते गुलाब भोये, विधानसभाप्रमुख शैलेश सूर्यवंशी, शिवसेना उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, भा.वि.सेनेचे वैभव ठाकरे, महेंद्र आव्हाड, महेंद्र बडवे, संजय थोरवे, संजय पिंगळे, तुषार पाटील, पोपट शिंदे, कल्पेश पिंगळे, अंकुश काकडे, स्वप्निल जाधव, सचिन धोंडगे, रितेश साळवी, सचिन आहिरे, अशोक जाधव, निखिल मराडे, शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा :

The post किरीट सोमय्यांविरोधात नाशिकमध्ये ठाकरे गट रस्त्यावर appeared first on पुढारी.