‘कुत्ता गोली’चे सिडकोत थैमान! अल्पवयीनांसह तरुण वर्ग नशेच्या अधीन; गंभीर प्रकार

सिडको (नाशिक) : नशा आणणाऱ्या ‘कुत्ता गोली’ने सिडकोत थैमान घातले असून, अल्पवयीनांसह तरुण वर्ग या नशेच्या अधीन होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. येथील संभाजी स्टेडियम परिसरात व्यसनाधीन तरुणांचा राबता वाढला आहे. त्यामुळे अन्न व औषध पुरवठा विभाग व पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई करून हा प्रकार वेळीच थांबवावा, अशी मागणी आहे. 

कुटुंबाला मुलांच्या व्यसनाधीनतेचा थांगपत्ताच नाही
कुत्ता गोली सिडको येथील एटीएम कट्टा, राधे गार्डन आणि पवननगर मैदानासारख्या ठिकाणी अल्पवयीन मुलांना सर्रास विक्री होताना दिसते. या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागालाही निवेदनाद्वारे कळविले आहे. यावर त्वरित कार्यवाहीची गरज आहे. ठाण्यात कुत्ता गोली विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे आढळून आले होते. शहरातील विविध भागात कुत्ता गोलीची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहे.त व्यसनाधीन तरुणांच्या कुटुंबाला मुलांच्या या व्यसनाधीनतेचा थांगपत्ता नसतो. अशीच काहीशी परिस्थिती सध्या सिडकोमध्ये बघायला मिळत आहे. याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. 

हेही वाचा - दशक्रियाची विधी पडली महागात! वारंवार सांगूनही नियमांची एैशीतैशी; परिसरात खळबळ

नशा आणणाऱ्या टॅबो गोळीची विक्री डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय जर कोणी मेडिकलधारक व अवैध विक्री करत असेल तर अशांचा गोपनीयरीत्या शोध घेऊन कडक कारवाई करण्यात येईल. 
-कमलाकर जाधव, पोलिस निरीक्षक, अंबड 

 

हेही वाचा - स्‍वयंपाकगृह ते थेट 'CA'! गिरणी व्‍यावसायिकाच्या लेकीची उत्तुंग भरारी

सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात कुत्ता गोलीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. यामुळे अल्पवयीन व तरुण वर्ग या गोळीच्या नशेच्या अधीन झाला आहे. यावर वेळीच कारवाई करण्यात यावी. 
-भगवान मराठे, सामाजिक कार्यकर्ते, सिडको