कृषिमंत्री थेट शेताच्या बांधावर! शेतकरी-शेतमजूर महिलांसोबत भाऊबीज

झोडगे (जि.नाशिक) : मालेगाव तालुक्यांतील गाळणे व टिंगरी येथे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट देऊन दीपावली व भाऊबीज सण स्थानिक शेतकरी बांधवांसोबत साजरा केला.

कृषिमंत्री थेट शेताच्या बांधावर! खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणित

यावेळी शेतकरी-शेतमजूर महिलांनी भाऊबीज सणांचे पारंपारिक पद्धतीन कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे औक्षण केले. शेतकरी महिला मजूर बांधवांसोबत खऱ्या अर्थाने आनंद द्विगुणित झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. टिंगरी येथील आदर्श प्रयोगशील शेतकरी सभापती राजेंद्र जाधव यांच्या केळी पिकाची पाहणी केली. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

 

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग