कॅबचालकाचे अपहरण करून जबरी लूट; एका संशयितास ताब्यात घेण्यात पोलीसांना यश

म्हसरूळ (जि.नाशिक) : सिन्नरला जाण्यासाठी चारचाकी कॅब बुक करून प्रत्यक्षात सिन्नरला न जाता शिर्डीकडे जात कॅबचालकाचे अपहरण करून जबरी लूटप्रकरणी आणखी एका संशयितास ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे.

कॅबचालक हत्याप्रकरणी आणखी एक अटक 

पोलिसांनी यापूर्वी कॅबसह दोघा अल्पवयीन संशयितांना कोपरगाव येथून ताब्यात घेतले आहे. चौघा संशयितांनी सहा दिवसांपूर्वी सिन्नर येथे कंपनीत जाण्यासाठी राहुल फेगडे (२८, रा. उत्तमनगर, सिडको) यांच्या कारमध्ये (एमएच १५ ई ७८३७) पंचवटीतील मंडलिक मळा येथून बसले होते. त्यानंतर त्यांनी सिन्नरला न जाता कार थेट शिर्डीकडे नेली. रस्त्यात अचानक कार थांबवून चालक फेगडे याचे हातपाय बांधून त्यास मारहाण केली. त्याच्याकडे पैशांची मागणी करीत दोन मोबाइल, एटीएम कार्ड व कार घेऊन पळून गेले होते.

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गिरी व पोलिस शिपाई योगेश ससकर यांनी संशयित साहिल जावेद शहा (२१, रा. पवननगर, ता. राहता, जि. नगर) याला ताब्यात घेतले.  

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच