केंद्रानं OBC समाजाचं मोठं नुकसान केलं, 2007 ला मिळालेलं आरक्षण 2017 साली हिरावून घेतलं : Chhagan Bhujbal
<p>जळगाव शहरातील ब्रिटिश अधिकारी पोलन याच्या नावे असलेल्या पोलांन पेठ परिसराचे महात्मा ज्योतिबा फुले नगर नामांतर सोहळ्याच्या निमित्ताने मंत्री छगन भुजबळ जळगाव दौऱ्यावर आले आहेत. नामांतर सोहळ्यात भाषण करतांना भुजबळ यांनी म्हटलं आहे की मागासर्गीयांसाठी काम करताना अडचणी येणार, त्याचा छगन भुजबळ करणार, शहाणपणा केला तर छगन भुजबळ करू अशी काही दिवस म्हण होती, पण लावलेले कोणतेही आरोप सिद्ध करता आले नाही, एवढेच काय आरोप सुध्दा न्यायालयात नीट मांडता आले नाहीत त्यामुळे काहीच न करता न्यायालयात दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं, असं भुजबळ म्हणाले.</p>