केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या डीबीटी योजना नोंदणीत महाराष्ट्र अव्वल! 

नाशिक : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयांतर्गतच्या थेट लाभ हस्तांतरणांतर्गत (डीबीटी) लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी १७ लाख ३४ हजार ८३० इतकी आहे. त्यात सर्वाधिक ४६ लाख १९ हजार ५०३ शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. देशातील ९२.७५ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्याच्या माहितीची नोंद योजनेत झाली असून, याही बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

गुजरातमध्ये बँक खाते ‘लिंक’साठी अक्षम्य दुर्लक्ष 

महाराष्ट्रातील ९९.७६ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्याची नोंद झाली आहे. दुसरीकडे मात्र गुजरातमध्ये बँक खाते ‘लिंक’ करण्याकडे यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे चित्र सरकारच्या संकेतस्थळावरील नोंदीवरून आढळते. 
गुजरातमधील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या एक लाख ८६ हजार २२६ इतकी असून, ८ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्याची माहिती उपलब्ध आहे. देशातील ९३ लाख ७९ हजार ४९९ म्हणजे ४३.५५ टक्के शेतकऱ्यांनी आधारकार्ड, एक कोटी १५ लाख ६३ हजार १५३ म्हणजेच, ५३.२० टक्के शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांक लिंक केला आहे. शिवाय दोन कोटी एक लाख ६० हजार ६५४ शेतकऱ्यांनी बँक खाते ‘लिंक’ केले आहे. देशातील मोठ्या आकारमानाच्या उत्तर प्रदेशातील २७ लाख ८० हजार ४४४ शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत. त्यांपैकी ३०.७० टक्के शेतकऱ्यांचे आधारकार्ड, २८.४६ टक्के शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक आणि ९९.७१ टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते ‘लिंक’ झाले आहे. तसेच बिहारमधील सहभागी ११ लाख ८१ हजार १०० शेतकऱ्यांपैकी १२.१२ टक्के शेतकऱ्यांचे आधारकार्ड, ४७.८३ टक्के शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक, ९९.६५ टक्के शेतकऱ्यांचे बँक खाते योजनेशी संलग्न झाले आहे.

हेही वाचा  - ''पुजा चव्हाणच्या मोबाईलवर संजय राठोड यांचे 45 मिस्डकॉल''; चित्रा वाघ यांचा नाशिकच्या पत्रकार परिषदेत दावा

९९.७६ टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्याची नोंद

महाराष्ट्राखालोखाल योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या मध्य प्रदेशातील आहे. ही संख्या ३२ लाख ६० हजार ४६८ इतकी आहे. त्यांपैकी २४.९२ टक्के आधारकार्ड, ६१.९७ टक्के मोबाईल क्रमांक, ९९.०८ टक्के बँक खाते शेतकऱ्यांनी योजनेसाठी दिले आहेत. दरम्यान, संकेतस्थळावर असलेल्या नोंदीनुसार २०२०-२१ मध्ये १४ योजनांसाठी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या ११ कोटी ६३ लाख १८ हजार ४९३ इतकी पोचली आहे. त्यांपैकी ११ लाख ४१ हजार ३२२ शेतकऱ्यांनी मोबाईल क्रमांकाची, तर ११ कोटी ५७ लाख १४ हजार ४३८ शेतकऱ्यांनी आधारकार्डची नोंदणी केली आहे. 

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना

कृषीच्या यंत्रणेपुढे आधारकार्ड अन्‌ मोबाईल ‘लिंक’चे आव्हान 
(महाराष्ट्रातील स्थिती दर्शविते) 
० आधारकार्ड लिंक केलेले शेतकरी- ११ लाख ५१ हजार २२९ (२४.९२ टक्के) 
० मोबाईल क्रमांक दिलेले शेतकरी- २२ लाख ८२ हजार ४८३ (४९.४० टक्के)