केंद्र सरकारचे द्राक्ष उत्पादकांबाबतची धोरणे अन्यायकारक – कृषिमंत्री दादा भुसे

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : द्राक्ष उत्पादक शेतकरी विविध संकटांनी पुरता पिचला आहे. त्यातच अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले असून, कर्जफेडीच्या विवंचनेत शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. द्राक्ष उत्पादकांच्या या व्यथा केंद्र सरकारकडे मांडण्याचे आश्‍वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथील शेतकऱ्यांना रविवारी (ता. २१) दिले. 

केंद्र सरकारचे द्राक्ष उत्पादकांबाबतची धोरणे अन्यायकारकल- भुसे
दोन दिवसांपूर्वी अवकाळीने झालेल्या द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहणी कृषिमंत्री भुसे यांनी केली. माजी आमदार अनिल कदम, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, भास्कर बनकर या वेळी उपस्थित होते. त्या वेळी मंत्री भुसे म्हणाले, की केंद्र सरकारचे द्राक्ष उत्पादकांबाबतची धोरणे अन्यायकारक आहेत. द्राक्ष उत्पादकांची बाजू मांडण्यासाठी येत्या दोन दिवसांत दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. द्राक्ष बागाईतदार संघाचे सचिव अरुण मोरे यांनी शेतकऱ्यांची कैफियत मांडली.

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

निर्यातीचे अनुदान बंद करण्याबरोबरच इंधन दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. द्राक्षाचे दर कोसळले आहेत. यावर शासनाने मध्यस्थी करण्याची गरज आहे. द्राक्ष वाहतुकीसाठी थेट रेल्वेची सुविधा केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

पिंपळगाव बसवंत येथे नुकसानीची पाहणी 
दरम्यान, मंत्री भुसे यांनी मुखेड येथील मधमाशी पालन केंद्रालाही भेट दिली. त्या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नीलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर, आशिष बागूल, सत्यजित मोरे, खंडू बोडके, केशव बनकर, राहुल शेळके, सागर झोमन, रूपेश शिंदे, सागर दुसाने, दीपक पुंड, आप्पासाहेब राजोळे, बी. बी. पवार, संजय पवार आदी उपस्थित होते.