
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने फिट इंडिया अभियान राबविले जाते. या अभियानात रणजितसिंग राजपूत यांची अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत फिट इंडिया मिशन निदेशक यांच्या वतीने नियुक्तीपत्र प्राप्त झाले आहे.
देशात आरोग्य विषयी जनजागृती व्हावी व देशभरात फिट इंडिया उपक्रमात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम जसे फिट इंडिया फ्रीडम रण, फिट इंडिया प्लॉगिंग रण, ‘फिट इंडिया सायकलाथॉन, फिट इंडिया क्विझ ह्यांसारख्या उपक्रमांमध्ये जास्तीतजास्त युवकांना सहभागी करून घेत तळागाळातील युवकांमध्ये फिटनेस च्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रणजितसिंग राजपूत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ना. विखेच मदतीला.. खा. लोखंडे दिसेना कुणाला! विखे पिता-पुत्र तत्काळ शिर्डीकरांच्या भेटीला
उल्लेखनीय कार्याची सरकारने घेतली दखल
रणजितसिंग राजपूत यांनी फिट इंडिया अभियानांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विविध उपक्रम घेऊन जिल्हा स्तरावर कार्य केले आहे. त्यात प्रामुख्याने भुसावळ शहरात आयोजित केलेला जिल्हास्तरीय ‘चेतक रण’ हा विशेष उल्लेखनीय ठरला. त्यांच्या कार्याची केंद्र सरकारने दखल घेत त्यांची नियुक्ती केली आहे. यापुढेही रणजितसिंग राजपूत यांना युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा युवक क्षेत्रात सर्वश्रेष्ठ ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ मिळलेला आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचे सुद्धा ब्रँड अँबेसिडर म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.
हेही वाचा :
- गोवा : बाबूश मोन्सेरात यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती
- पणजी : बनावट कागदपत्रांद्वारे जमीन खरेदी-विक्री; जामिनावरील फरारी संशयितास पुन्हा अटक
- औरंगाबाद : चौथ्या दिवशी पाणी द्या; हायकोर्टाने दिले महानगरपालिकेला निर्देश
The post केंद्र सरकारच्या ‘फिट इंडिया’ अभियानाच्या अँबेसिडरपदी रणजितसिंग राजपूत appeared first on पुढारी.