केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? – संजय राऊत

नाशिक : केंद्र सरकार, शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. गझिपुर ला जाऊन टिकेत चर्चा केली. शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार
असतील. हे शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलंआहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांनी हिंसक व्हावं ही अपेक्षा आहे का ? तसेच केंद्राने कायदे मागे घेऊन चर्चा करावी. शिवसेना खासदार संजय राऊत नाशिकमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी जनतेशी संवाद साधत होते.
 

देशात अराजकता निर्माण व्हावी असं सरकारला वाटतं. अहंकार जनतेपूढे चालत नाही. बहुमत आहे म्हणून अहंकार योग्य नाही. हे राजकीय पक्षांचे नाही तर किसान संघटनांचे आंदोलन आहे.

वैद्यकीय मदत कक्ष हे सरकारचे नाही तर शिवसेनेचे काम

 महाराष्ट्रात जेव्हा कोरोना संकट आले अशा वेळेला राज्यातील लोकांच्या कोणी मदतीला आले असेल तर ते शिवसेनेचा वैद्यकीय कक्ष असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. कोरोना काळात शिवसेनेने मोठे काम केले असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यात ग्रामीण भागातील लोकांना शहरात उपचारासाठी यायला जमत नाही. नाशिकच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी पुणे-मुंबईत उपचारासाठी यायला जमत नाही. त्यांच्या उपचारासाठी शिवेसेनेचे वैद्यकीय कक्ष उभे करण्यात आले आहे. शिवसेना सरकारमध्ये आहे परंतु शिवसेना स्वतंत्र काम करते आणि शिवसेना काय काम करते हे या वैद्यकीय कक्षाने दाखवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच\

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल