केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र

कांदा भाव

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

केंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे प्रश्न लक्षात घेता त्यांचे हित जपण्यासाठी नाशिक व अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

2410 प्रतिक्विंटल या दराने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी खास नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय मंत्रीपियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ट्विट करुन फडणवीसांनी दिली आहे.

 

The post केंद्र सरकार करणार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र appeared first on पुढारी.