Site icon

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी आमदार आणि इंटकचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास निधन झाले.  ते 75 वर्षाचे होते.  गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दरम्यान काल त्यांना ह्दय विकाराचा धक्का आल्याने नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांचा मृत्यू झाला.

काँग्रेस पक्षाशी निष्ठावान असे त्यांचे घराणे होते. युवक काँग्रेस पासून आपल्या कारकीर्दीची त्यांनी सुरुवात केली.  पक्षातील शहर आणि प्रदेश पातळीवरील अनेक संघटनात्मक पदे भूषवली तसेच तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा लौकिक होता.

नाशिकच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते.  त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि नाशिकच्या माजी उपमहापौर शोभा छाजेड, मुलगा प्रीतिश हितेंद्र आणि आकाश असा परिवार आहे. बुधवारी (दि. 11) नाशिकच्या काँग्रेस कमिटी (कार्यालय) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून सायंकाळी 6 वाजता नाशिक अमरधाम मध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

The post कॉंग्रेसचे जेष्ठ नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन appeared first on पुढारी.

Exit mobile version