कोणाच्याही ध्यानी मनी नसता घेतली नदीपात्रात उडी; २२ वर्षीय तरुणाच्या कारनाम्यामुळे परिसरात खळबळ

देवळा (जि.नाशिक) : वडील व चुलते मुलाला वाहनात बसवून घेऊन येत होते. चहा पिण्यासाठी गाडी थांबविली असता २२ वर्षीय तृणालला अचानक काय झाले..कोणालाच कळले नाही..कोणाच्याही ध्यानी मनी नसता त्याने गाडीतून पळ काढला आणि गिरणा नदीजवळ पोहचला...

कोणाच्याही ध्यानी मनी नसता नदीजवळ पळाला... 

तृणाल सोनवणे याने काही दिवसांपूर्वी आपल्या घरची बैलगाडी बैलजोडीसह चोरून विकल्याने त्याच्याविरुद्ध सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिंदे-पळसे (ता. सिन्नर) येथे रविवारी (ता. २२) त्याचा शोध लागल्याने त्याचे वडील राजेंद्र सोनवणे व चुलते दिनेश सोनवणे त्याला वाहनात बसवून घेऊन येत होते. ठेंगोडा (ता. बागलाण) येथे चहा पिण्यासाठी गाडी थांबविली असता तृणालने गाडीतून पळ काढत पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारली. सोमवारी (ता. २३) दुपारी अडीचला त्याचा मृतदेह मिळून आला.

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

परिसरात खळबळ

लोहोणेर (ता. देवळा) येथील गिरणा नदीपात्रात पुन्हा एकाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डांगसौंदाणे (ता. बागलाण) येथील तृणाल राजेंद्र सोनवणे (वय २२) असे या मृताचे नाव आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता